II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I दि.२९ सप्टेंबर
सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्सवात साजरा होत आहे.बहुतेक ठिकाणी गणेश मूर्तीजवळ वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावातील सुशांत मोहन नाईक यांच्या गणेश मूर्तीजवळ सत्यनारायण पूजेसाठी बनविण्यात येणारे मखर अप्रतिम असे “चंद्रयान” या यानाची हुबेहूब प्रतिकृती सादर केली.हे संपुर्ण मखर केळीच्या झाडापासून करण्यात आले.
हे यान पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्तांनी मोठया संख्येने याठिकाणी पूजेला उपस्थित राहून या कलेची मुक्तकंठाने स्तुती केली.ही अप्रतिम प्रतिकृती सादर करून नाईक कुटुंबीयांनी देशप्रेम व्यक्त केले आहे.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!