▪️द्वितीय क्रमांक सरिता भंडारे आणि तृतीय रेखा डंकी…

▪️१२ सप्टेंबर ला होणार तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा… केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.०३ सप्टें.
तृणधान्य पौष्टिकता जागरूकता पालकांबरोबर मुलांपर्यंत यावी तसेच निसर्गाने दिलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आहारात केल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ होईल असा विश्वास केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी व्यक्त केला ते सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये आयोजित केंद्रस्तरीय शाळांच्या तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी तृणधान्य खाद्यपदार्थ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कळसुरकर इंग्लिश स्कूल तर्फे डॉ.रश्मी शुक्ला यांच्या पंचधान्याचे ‘पौष्टिक मोदक’ या पदार्थांला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा नंबर दोन च्या सरिता भंडारे यांना ‘हाळ्याची सांजोली’ ला मिळाला तर तृतीय क्रमांक पंचधान्याची ‘भाकरी व टायकाल्याची भाजी’ या जि प शाळा नंबर सहाच्या रेखा डंकी यांच्या पाककृतीला देण्यात आला.
या स्पर्धेमध्ये १२ शाळांच्या पालकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे कविता देसाई मुख्याध्यापिका चैताली गवस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत माजी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे कळसूलकर इंग्लिश स्कूलच्या सोनाली बांदेलकर मुख्याध्यापक ध्रुवसिंग पावरा, शाळा नंबर चार च्या लक्ष्मी धारगळकर, मृगनयना सावंत, सुजाता डांगी, प्राची ढवळे, भक्ती फाले, पूजा ठाकूर, नंदू गावडे,अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर, आदीसह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने केंद्रशासना पुरस्कृत प्रत्येक शाळांमध्ये तृणधान्य पौष्टिक खाद्यपदार्थांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता वर्षभर हे उपक्रम राबवले जाणार आहेत यामध्ये पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार १२ सप्टेंबरला तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा होणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख ठाकूर यांनी दिली
यावेळी झालेल्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण प्रसंगी बोलताना कृषी पर्यवेक्षक गव्हाणे म्हणाले तांदूळ गहू आणि मका हे तृणधान्यांमध्ये येत नाही त्यामुळे ज्वारी नाचणी बाजरी यासारख्या तृणधान्यांबरोबर अळू, टायकुळा, कुर्डू, शेवग्याची भाजी यासारख्या निसर्गाने दिलेल्या भाज्या असून त्या प्रत्येकाने खाव्यात म्हणजे आरोग्य सुदृढ राहील या भाज्या कोणी रुजवत नाही त्यांना खत घालत नाही तर त्या भाज्या निसर्ग देतो त्यामुळे त्या अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत असे ते म्हणाले
यावेळी पर्यवेक्षक देसाई यांनी फास्ट फूड चा वापर टाळा असे आवाहन केले.
या स्पर्धेमध्ये एकूण बारा पदार्थ ठेवण्यात आले होते. यात ज्वारीचे नूडल्स, मिक्स पिठाची भाकरी, पिठले, उकडलेल्या करंज्या, खांडवी, पौष्टिक मोदक, नाचणीचे घावन तसेच ज्वारी व नाचणीचे लाडू सुद्धा ठेवण्यात आले होते. __________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!