II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I दि.२५ ऑगस्ट
आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कूल नेरुर येथे आज रानभाजी प्रदर्शन व खास महिला पालकांसाठी रानभाज्या पाककला स्पर्धा आयोजित केली होती.विविध रानभाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी,सकस व पौष्टिक आहार रानभाज्यांच्या सेवनातून मिळतो हे पटवून देण्यासाठी मुख्याध्यापक सौरभ पाटकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित केले होते.पाककला स्पर्धेसाठी सौ.विनया चव्हाण व सौ.श्रध्दा गोसावी यांनी परीक्षण केले.एकूण सोळा पाककृती स्पर्धेत ठेवण्यात आल्या होत्या. पाककला स्पर्धेत सौ.अमृता नाईक यांनी केलेल्या अळूच्या पानांची पोटलीला प्रथम क्रमांक,सौ मयुरी पारकर यांच्या एक पानाची भाजीला द्वितीय तर सौ.रोहिणी मयेकर यांच्या टायकळ्याच्या पानांचे पौष्टिक पराठेला तृतीय क्रमांक मिळाला.स्पर्धेचे बक्षीस वितरण सन्मा.मंजुनाथ फडके,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष प्रसाद मठकर, सदस्य सावंत गुरुजी व परीक्षक सौ.विनया चृव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षिय मनोगतात मंजूनाथ फडके यांनी असे विद्यार्थ्योपयोगी उपक्रम शाळेत राबवावेत माझे नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.श्रध्दा गोसावी,सौ.चेतन्या चव्हाण,कु.किर्ती भोगटे,कु.शालिनी चव्हाण,सौ.वेदिका परब,सौ.आरोही तारी,सौ.सिया वालावलकर यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक सौरभ पाटकर यांनी आभार मानले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!