▪️इर्शाद शेख; मोदी सरकारचा जनतेच्या मतांवर डोळा…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I दि.३० ऑगस्ट
सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपये कमी करण्याची घोषणा केली आहे. महागाईमुळे केंद्र व राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता निवडणूका जवळ आल्यामुळे आपण कसा जनतेचा विचार करतो हे दाखवण्यासाठी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचे नाटक सरकार करत आहे यांना जनतेच्या सुख-दुःखाशी काही देणे घेणे नाही यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. एप्रिल २०२१ पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३७९ रुपये वाढ करण्यात आली आहे आणि आता फक्त २०० रुपये कमी करून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न या सरकार कडून केला जात आहे. जेव्हा २०१४ ला मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा घरगती गॅस सिलेंडरचा दर ४१० रुपये होता तो आता किती आहे हे जनता जाणते. हे सरकार फक्त निवडणूकजिवी आहे यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत जनतेला या सरकारचे अप्रत्यक्ष म्हणणे हेच आहे की तुम्ही आम्हाला पुनः सत्ता द्या आम्ही पुन्हा पुढच्या निवडणूका येई पर्यंत तुम्हाला लुटून तुमचे जगणे मुश्किल करू आणि पुन्हा पुढची निवडणूक आली की पुन्हा अशीच नौटंकी करू. पण जनतेला हे सर्व कळून चुकले आहे हे सरकार सर्वसामान्यांचे नाही तर हे सरकार मूठभर उद्योगपती मित्रांचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर गेल्या एक दिड वर्षापासून मोठ्याप्रमाणात कमी झाले आहेत त्यातच युक्रेन युद्धामुळे भारताला रशियाकडून स्वत दरात क्रूड ऑईलचा पुरवठा होत आहे तरी सुद्धा मोदी सरकार पेट्रोल व डिझेलवर एक रुपया कमी करायला तयार नाही यावरून सर्वसामान्य जनतेप्रती हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येते. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने जनतेची फक्त आणि फक्त लूट केली आहे या सरकारला येत्या निवडणुकीतच नाही तर आता सुद्धा सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी खरमरीत टीका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!