,

कवी आणि कलाकारांच्या कल्पना शक्तीचा आपण अंदाज बांधू शकत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सावंतवाडीतील छायाचित्रकार शिवप्रसाद ठाकुर उर्फ उंडगो यांनी राजकोट ते देवबाग किनारा या परिसराचे ड्रोनने काढलेले छायाचित्र अगदी “ओम” असल्याचे भासत आहे, तसा त्यांनी दावा केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून काढलेला नयनरम्य देखावा त्यांनी वाचकांसाठी पाठविला आहे. या दोन्ही किनार्‍यावरुन बाईक राईड केल्यास हा नजारा निश्चितच निसर्गप्रेमींना पाहता व त्यांचा आनंद घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
श्री. ठाकुर हे मुळचे सावंतवाडीचे आहेत. ते प्राणी आणि निसर्गप्रेमी आहेत. दुरवर जावून त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडते. दरम्यान यापुर्वी सुध्दा त्यांनी असे अनेक प्रयोग केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण मालवण राजकोट किल्ल्यापासून ते देवबाग पर्यत प्रवास करताना हा नजारा त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याला त्यांनी आपल्या ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून चित्रबध्द केले आहे. या अनोख्या निसर्ग सौंदर्याचा निसर्ग प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ठाकुर यांनी केले आहे.
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!