II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I दि.२९ ऑगस्ट
येथील आदित्य हळदणकर मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्या वतीने आज मंगळवार दि २९ ऑगस्ट रोजी चि. समर्थ आदित्य हळदणकर याच्या ६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग ६ व्या वर्षी रक्तदान शिबिरास आयोजन बी के खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे करण्यात आले.यावेळी या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तर महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षवेधी होता.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ,श्रीमती सुप्रिया सुभाष हळदणकर,देऊलकर सर,आरोलकर सर,नाईक सर,सुरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे गोवा समन्वयक संजय पिळणकर,राजेश पेडणेकर, भूषण मांजरेकर,यश किनळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शिव केरकर,पीटर डीसौझा,निलेश गवस,अमित म्हापणकर,अमित नाईक,सौरभ धुरी,विल्सन डीसौझा, सचिन मांजरेकर,सौ भक्ती हळदणकर, श्रीम श्रुती मयेकर आदींनी परिश्रम घेतले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!