▪️उपस्थितांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२८ ऑगस्ट
श्री कुलदेवता विद्यामंदिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मळेवाड नंबर २ येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांचे प्रदर्शन व विक्री हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देणे व बाजारात आपण बनविलेल्या वस्तू विकण्याचा अनुभव प्रत्यक्ष देणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनाला मळेवाड कोडूरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे,लाडोबा केरकर,सदस्य सानिका शेवडे, मधुकर जाधव,अमोल जाधव,अमित नाईक,सुरेखा टिकस,श्रीमती मेस्त्री, दत्ताराम नाईक, सगुण जाधव,नारायण मुळीक,भीवसेन मुळीक ,गीतेश मुळीक,गोपाळ रेडकर ,महेश मुळीक,लक्ष्मण मुळीक,सुरेश मसूरकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक श्यामसुंदर कळसूलकर , शिक्षक विजय गावडे,शामल कळसूलकर व जयश्री हरमलकर यांनी प्रयत्न केले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!