II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२८ ऑगस्ट
तालुक्यातील इन्सुली खामदेव नाका येथील काजू फॅक्टरीमध्ये रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांच्या आत गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग च्या पथकाला यश आले आहे.या चोरी प्रकरणी सावंतवाडी सालईवाडा परीट पाणंद येथील कन्हैया मनोरंजन गिरी ( वय ३३,मुळ रा.डमामी शिवनगर,बेलसंडा,जिल्हा- सितामढी बिहार यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
तसेच त्याच्याकडून १ आयफोन व डोकोमो गॅलक्सी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चराठा टेमवाडी येथील रहिवासी दिगंबर सदाशिव बोंद्रे यांच्या इन्सुली खामदेव,नाका येथील शिवदुर्गा कॅश्यु फॅक्टरी आऊटलेट,या दुकानात दि २६ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात इसमाने दुकानाच्या मागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करुन ४८ हजार रोख व १ मोबाईल हॅन्डसेट चोरुन नेले होते.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचेकडून सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू असतांना घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीने रेनकोट घालून चोरी केल्याचे दिसून आले.सदर फुटेज व आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा ॲक्टीव्हा पांढऱ्या रंगाची गाडी यावरुन तपास करत असताना सावंतवाडी सालईवाडा, परीट पाणंद येथून संशयित आरोपी कन्हैया मनोरंजन गिरी (वय ३३,मुळ रा. डमामी शिवनगर,बेलसंडा,जिल्हा- सितामढी ( सितामही) राज्य बिहार ) याला सापळा रचुन दि २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टीव्हा दुचाकी क्रमांक ( एम एच ०७ ए आर १९६८ ) सह ताब्यात घेतले.
सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.त्याचप्रमाणे त्याने केलेला कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हाही उघडकीस आलेला आहे. आरोपी व त्याचे साथीदारांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये दिवसा किंवा रात्रौ घरफोडी अजुन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व बांदा पोलीस ठाणे यांचेमार्फत चालू आहे.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!