II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ बांदा I यश माधव : दि.३१ जुलै
विरोधात असताना आमची सत्ता आल्यावर आम्ही वीज पुरवठा मोफत करू अशी वक्तव्य करणारे आज सत्ते उजत आहेत. परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून वीज दरवाढ करून सर्वसामान्य लोकांना पर्यायी वीज ग्राहकांना सत्ताधाऱ्यांनी शॉक दिला आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांचा कार्यभार नागरिकांच्या लक्षात आल्याचा टोला, शिवसेना(ठाकरे) बांदा शहरप्रमुख साई काणेकर यांनी लगावला.
बांदा शहरात गेले दोन दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी श्री. काणेकर बोलत होते. गडगेवाडी येथील एका वीज ग्राहकाच्या घराजवळ सेवा वाहिनी तुटून सात महिन्याचा कालावधी उलटला तरीही अद्याप वाहिनी जमनिवरच आहे. पोलिस ठाण्यात सुध्दा याची नोंद करण्यात आली. तसेच नवीन वीज मीटर मागणी करूनही मिळत नसून जुन्या मीटरच्या आधारे वाढीव बिल आकारले जाते. त्यामुळे हे वसुलीची ट्रिपल दुकान उघडले की काय याबाबत शंका आहे. सर्व कर लावून बिल वसुली करण्यात येते मग सेवा देण्यात अपयशी का ठरता असा सवाल श्री. काणेकर यांनी केला.
दरम्यान, वीज बिल माफिवर जे बोलत होते त्यांनी जागे होऊन निदान वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी तरी प्रयत्न करावा. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारंवार खोटे बोलून वेळ मारून नेऊ नये तर पुर्ण क्षमतेने काम करावे. वीज सेवा पुरविण्यास राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार सफशेल अपयशी ठरले असल्याचा टोला साई काणेकर यांनी बांदा वीज कार्यालयात लगावला. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते सुशांत पांगम व कार्यकर्ते उपस्थित होते.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!