▪️भावी पिढीत संस्कार,हिंदू धर्माचे ज्ञान घडविण्याच्या उद्देशाने धर्मसंस्कार वर्गाचे आयोजन…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ मळेवाड I मदन मुरकर : दि.३१ जुलै
श्रीदत्तपद्मनाभ पीठ ,तपोभूमी गोवा तसेच शिवप्रतिष्ठान यांच्यामार्फत हिंदू धर्माचे ज्ञान, लहान मुलांना प्राप्त होण्यासाठी, मुलांना संस्कृत पठण, संस्कृत वाचन येण्यासाठी भावी पिढीत संस्कार घडविण्याच्या उद्देशाने धर्मसंस्कार वर्ग मळेवाड गावात सुरू करण्यात आला आहे.
मळेवाड येथील नाईक वंस मंदिर ( नाईकवाडी) येथे हा धर्मसंस्कार वर्ग दर रविवार सकाळी चालविण्यात सुरू करण्यात आला आहे.
मुलांना संस्कारीत होण्यासाठी या धर्म संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात नंदू नाईक ,श्रीकांत नाईक यांनी सांगितले.तसेच या धर्म संस्कार वर्गाबाबत तपोभूमी (गोवा) येथील संस्कृत शिक्षक सुधाकर उत्तुरकर यांनी मुलांना याबाबत अधिक माहीत देऊन जास्तीत जास्त मुलांनी या वर्गाचा लाभ घेण्याचे यावेळी आवाहन केले.
या वर्गातील सर्व मुलांना लागणारे साहित्य वह्यांचा संच आरोस येथील निलेश (बाळा) परब मित्र मंडळ यांनी पुरस्कृत केले तर याचे वाटप मळेवाड येथील सेवानिवृत्त माजी पि .स्.आय श्री सगुण (बापू) नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या वर्गातील सर्व मुलांना वह्यांचे संच दिल्याबद्दल श्री निलेश (बाळा) परब यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी गोवा तपोभूमी येथील या वर्गाचे संस्कृत शिक्षक श्री.सुधाकर उत्तूरकर, माजी पि.एस.आय.सगुण नाईक, पि.एस.आय.अधिकारी श्री .सीताराम नाईक,महेश शिरसाट नंदू नाईक,मदन मुरकर,श्रीकांत नाईक,प्रवीण नाईक,शंकर सावळ,सौ. दिव्या काळोजी ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू नाईक तर आभार प्रदर्शन महेश शिरसाट यांनी मानले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!