▪️गावासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन .

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ मळेवाड I मदन मुरकर : दि.३० जुलै
मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा स्लॅब धोकादायक झाल्याने अंगणवाडी साठी निधी मिळावा याबाबत श्री राजन तेली यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडीच्या नूतन इमारतीसाठी बारा लाख तीस हजार रुपयांचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून श्री तेली यांनी उपलब्ध करून दिला.या निधीतून मळेवाड (कुंभारवाडी) येथे नव्याने अंगणवाडी इमारत उभारण्यात आली. आज या इमारतीचा शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव यांनी गावाच्या विकासासाठी राजन तेली यांनी निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. लाडोबा केरकर यांनी गावाचा विकास होत असताना निधी मिळणे हे फार गरजेचे असते.मात्र ती गरज लक्षात घेऊन नेहमी पाठपुरावा केल्याने या ठिकाणी निधी उपलब्ध होऊन आज नव्याने इमारत उभी झाली.याबद्दल राजन तेली आणि ग्रामपंचायत सरपंच व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.विकास नाईक यांनी गावाच्या विकासासाठी येत असलेला कोट्यावधी निधीबद्दल ग्रामपंचायत सरपंच व सर्वांचे कौतुक करत असताना राजन तेली यांनी हा निधी देण्यासाठी केलेले सहकार्य हे लाख मोलाचे असून भविष्यातील त्यांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नाईक यांनी केले. यांना केले.यावेळी ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर,अंगणवाडी सेविका संगीता माळकर,मदतनीस मंजिरी कुंभार, पत्रकार मदन मुरकर यांचा तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच गावासाठी व अंगणवाडीच्या इमारतीसाठी विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावाच्या वतीने राजन तेली यांचा ताता कुंभार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना राजन तेली यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देत याचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.तसेच निधी देत असताना वेगवेगळ्या स्वरूपाची कामे देणे अपेक्षित असतं.त्यालाच अनुसरून मळेवाड कोंडुरे गावातील कामे सुचवली असून त्यासाठी भविष्यातही निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच मळेवाड कुंभारवाडी येथील कुंभारवाडी ते गणेश मांड रस्त्याचे डांबरीकरणासाठी आपण प्राधान्याने या ठिकाणी निधी उपलब्ध करून देईन अस आश्वासन ग्रामस्थांना दिल.गावाच्या विकासासाठी आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल.तसेच आपलेही सहकार्य आम्हाला असू द्या असे आवाहन उपस्थिताना तेली यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत मराठे यांनी करत असताना गावात विकास कामांसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आलेल्या निधी बाबत माहिती दिली.कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून भाषण करत असताना सरपंच मिलन पार्सेकर यांनी अंगणवाडीतील मुले ही झाडासारखी असतात जसे आपण झाडाचे संगोपन करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करतो तसेच संगोपन या मुलांचे करून त्यांना चांगले शिक्षण,चांगले संस्कार करून चांगला समाज व व्यक्ती बनण्यासाठी त्याना ज्ञानदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. गावाचा विकास करत असताना आम्ही आमच्या परीने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत असून ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले आहे तसेच सहकार्य कायमस्वरूपी ठेवा.आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासित केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,सदस्य स्नेहल मुळीक, सदस्य गिरिजा मुळीक सदस्य कविता शेवडे,सदस्य अर्जुन मुळीक,सदस्य महेश शिरसाठ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर,दाजी सावळ,गजानन शिरसाट,दादा मोरुडकर,रामचंद्र नाईक, रवींद्र मुळीक,नंदू नाईक,तलाठी संदीप मुळीक,महेश कुंभार,नाना कुंभार, गणेश कुंभार,लवू सातार्डेकर,विजय चराटकर, तसेच बचत गट सीआरपी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा सेविका, पालक,ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!