II KBC NEWS II

kokanbhumi
🖥️ वेंगुर्ला | संजय पिळणकर :दि.३० मे
रा.कृ.पाटकर हायस्कूल,वेंगुर्लाच्या इयत्ता १० वी १९८४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी न भूतो न भविष्यति असा गेट टुगेदर कार्यक्रम वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्र येथे साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भगवान मसुरकर आणि शिरीष कोरगावकर यांनी केले.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर देवाज्ञा झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाला एकूण १०५ विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम आपला परिचय करुन दिला.तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यावेळी ३९ वर्षानंतर पुन्हा दहावीचा वर्ग भरल्यासारखा वाटत होता.कमतरता होती ती फक्त शिक्षकांची.जेवणाच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शैलेश जामदार आणि अनिता आरोंदेकर यांचा गायनाचा कार्यक्रम झाला.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय आरोंदेकर यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जॉन्सन डिसोजा,शिरीष कोरगावकर, नरेंद उर्फ बाळा शिरसाठ,प्रसाद महाले,स्वाती प्रभू,शहनाज शेख, नितीन सावंत,ॲड.जी.जी.टाककर, भगवान मसुरकर,पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण,जाफर शेख,जयंत भाटिया,उमेश चव्हाण,मनोज आरोसकर आणि भूषण नाबर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचा ग्रुप फोटो काढून सायंकाळी ७ वाजता कार्यक्रम संपविण्यात आला.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!