*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.२२_*
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कलवर कार व दुचाकीत जोरदार धडक झाली.या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा बळीराम गवस ( ३५, सध्या रा. मळगांव मूळ रा. सासोली हेदूसवाडी दोडामार्ग )असे त्याचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. या अपघातात तो जागीच कोसळला व गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अपघाताची माहिती मिळताच मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेला पाचरणे केले मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. कारचालक राहील जहिर दादला ( अंधेरी मुंबई ) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, उपनिरीक्षक अमित गोते, हे. कॉ. डी.व्ही. नाईक यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

———————————–

*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!