II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ पेडणे | दि.०३ एप्रिल
शिवाजी महाराजानी आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला. रयतेच्या मनावर अधिराज्य करणारे ते थोर युगपुरुष होते. त्यांच्या जन्मानंतर ३९४ वर्षात आजही महाराजांचे विचार प्रेरणादायी आहेत. संपूर्ण जगात महाराज विश्ववंदनीय आहेत. त्यांनी दिलेला स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, प्रजाहीत दक्षता, खंबीर प्रशासन, युद्धशास्त्र, उद्योग, परराष्ट्र घोरण, मानसशास्त्र या मुल्यांचा आज एकविसाव्या शतकातही तंतोतंत वापर होणे शक्य आहे. विद्यमान शासनकर्त्यांनी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यास महाराजांचे स्वराज्य पुन्हा अनुभवणे शक्य आहे, असे उदगार भावार्थ मांद्रेकर यांनी हळर्ण पेडणे येथे काढले.

छत्रपती शिवाजी महाराज समिती हळर्ण किल्ला यांनी
ऐतिहासिक हळर्ण किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजिन केले होते. त्यावेळी केरी न्यू इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक, साहित्यिक व इतिहासकार भावार्थ मांद्रेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून उत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपिठावर समितीचे सदस्य गुरुदास परब, दत्ता परब, ज्येष्ठ नागरीक यशवंत हळर्णकर, संगीत शिक्षिका कांचन भिडे, नाट्य कलाकार गोविंद नाईक हे मान्यवर उपस्थीत होते.

भावार्थ मांद्रेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओजस्वी वक्तृत्वातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अनेक प्रसंग त्यांनी यावेळी कथन केले.

याप्रसंगी शिवकालीन प्रसंगावर आधारीत दोन गटात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात एकूण ३० स्पर्धकानी सहभाग घेतला होता.

अ गटात इशान्वी विशाल गवस पहिला क्रमांक, नुरवी नरेन्द्र राऊळ दुसरा क्रमाक, अविघ्न नारायण चव्हाण याने तिसरा क्रमांक पटकावला. “ब” गटात पुर्वि प्रशांत परब, धनश्री चंद्रकांत नाईक द्वितीय, अथर्व गुरुदास शेठ यांने तिसरा क्रमांक पटकावला.

विजेते स्पर्धक व इतर सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पाहूण्यांची ओळख समिती सदस्य उमेश गवस यांनी केले. सुत्रसंचालन अमेय सावंत यांनी केले. तर शेवटी आभार प्रदर्शन नेहा शिरोडकर यांनी केले,

फोटो : हळर्ण पेडणे येथे ऐतिहासिक किल्ल्यावर शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज समिती पदाधिकाऱ्यासोबत प्रमुख वक्ते भावार्थ मांद्रेकर.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!