▪️सेवानिवृत्तनिमित्त त्रिंबक आजगांवकर गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२४ मार्च
‘शामची आई’ ग्रंथाच्या माध्यमातून घराघरात पहोचलेले मातृहृदयी साने गुरुजी पुस्तकातून भेटलेत. मात्र प्रत्यक्ष शैक्षणिक क्षेत्रातील साने गुरुजींचा वसा जोपासत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जीवाचं रान करणारे आधुनिक साने गुरुजी भाऊ उर्फ त्रिंबक आजगांवकर गुरुजींच्या रूपाने आम्हाला मिळाले. भाऊ गुरुजींचा साऱ्यांनाच सार्थ अभिमान आहे, असे गौरवास्पद विधान सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केरवाडा – शिरोडा येथे केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवाडा शिरोडा (ता. वेंगुर्ला) या प्रशालेचे वार्षिक पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलन तसेच सेवापूर्तीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक त्रिंबक उर्फ भाऊ आजगांवकर यांचा स्नेह सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रुपेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा कार्यकर्ते डॉ. तारक मंगेश आरोलकर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा चोपडेकर, श्री. अमित घोगरे, उपाध्यक्ष दिविजा बटा, प्रेम नार्वेकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष पवित्रा निकम, मच्छीमार सहकारी संस्था केरवाडा, शिरोडाचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर, माऊली देवस्थान केरवाडाचे खजिनदार आत्माराम साळगावकर, पोलीस पाटील लक्ष्मण तांडेल, ग्रामपंचायत सदस्य सुधीर नार्वेकर, प्रथमेश बांदेकर, यांसह माजी मुख्याध्यापक व सत्कारमूर्ती त्रिंबक आजगांवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा चोडणकर, शालेय मुख्यमंत्री नव्या नाईक, शालेय सांस्कृतिक मंत्री मनस्वी नाईक आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरवाडा – शिरोडा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक त्रिंबक उर्फ भाऊ आजगावकर यांच्या तब्बल ३७ वर्षाच्या शैक्षणिक सेवेच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा सत्कार समारंभ देखील संपन्न झाला. याचे आयोजन शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पालक, ग्रामस्थ, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे वक्ते प्रा. रुपेश पाटील म्हणाले की, भाऊ आजगांवकर गुरुजी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक शाळा कशी असावी ?, शालेय आदर्श कामकाज कसे करावे?, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण एक शिक्षक म्हणून कशी भूमिका निभवावी?, याचा एक आदर्श नमुना पेश करून सातत्याने विद्यार्थी हित जोपासले आहे. भाऊ गुरुजी जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांचा आदर्श हा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभाप्रमाणे ऊर्जा देणारा ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी प्रा. पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. तारक आरोलकर यांनी केरवाडा शाळा तीन वर्षासाठी दत्तक घेऊन शाळेच्या सुशोभनासाठी तब्बल एक लाख रुपये देणगी दिली. तसेच आगामी काळात शाळेच्या मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवून देऊ, असे देखील आश्वासन दिले. यावेळी सर्व पालक व ग्रामस्थांच्या वतीने माजी मुख्याध्यापक आजगांवकर गुरुजी यांनी ॲड. डॉ. तारक आरोलकर यांचे विशेष आभार मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप नाईक, संजय धुरी, मुख्याध्यापिका श्रद्धा चोडणकर, संदीप ढोले, संतोष नाईक, सोनाली नाईक, सौ. गवंडी ताई, भूषण नाईक, श्री. चोडणकर गुरुजी तसेच स्वयंसेवक हर्षद चोडणकर, पूजा साळगावकर, तनुजा रेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थी पालक अक्षरशा गहिवरले-
यावेळी माजी मुख्याध्यापक त्रिंबक उर्फ भाऊ आजगांवकर यांचा सेवापूर्तीनिमित्त शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने सहृदयी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभवेळी त्रिंबक गुरुजी यांच्या वागणूकीबद्दल अनेकांना गहिवरून आले. तेथे उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात गुरुजींच्या स्नेह आणि आपुलकीबद्दल अश्रू साचले होते. हे पाहून संपूर्ण वातावरण भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक त्रिंबक आजगांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. ढोले यांनी केले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!