▪️भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा मंडळाच्या वतीने आवाहन…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२१ मार्च
प.पू.सद्गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदिराचा शिलान्यास सोहळा शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सकाळी ९:३० ते ११: २५ या वेळेत माडखोल धवडकी “अवधूताश्रम” बेबीवाडी येथे प.पू. संत श्री फलाहारी महाराज (प.पू. संत श्री भालचंद्र महाराज यांचे शिष्य, लोणावळा) यांच्या शुभहस्ते संपन्न होतं आहे.

या कार्यक्रमाचे यजमान म्हणून वे.शा. सं. श्री दिगंबर शंकर पुजारी ( नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देव संस्थान, नृसिंहवाडी चे माजी अध्यक्ष) असणार आहेत तर समर्थ साटम महाराज समाधी मंदिर, दाणोली चे अध्यक्ष श्रीमंत खेम सावंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्याला सर्व भाविक भक्तांनी तसेच सर्व गुरुबंधू,भगिनींनी, सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे तसेच दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॐ श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!