II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१५ मार्च
मळेवाड देऊळवाडी येथील खेमराज पुलाच्या नूतन बांधकाम कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाळून करण्यात आला.

मळेवाड देऊळवाडी येथील मार्गावर असलेल्या नदीवर १९४२ साली ऐक्य वर्धक संस्था मळेवाड या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने पूल उभारला होता.खूप जुना पूल असल्याने व तो वाहतुकीसाठी अरुंद असल्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा अशी गेली कित्येक वर्षाची ग्रामस्थांची मागणी होती.अखेर ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाने व केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने सदर पुलाला दोन कोटी ६० लाख मंजूर झाले.गुरुवारी या पूलाच्या नूतन बांधकाम कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री देव वेतोबा कुलदेवता पूर्वी पंचायतन देवतेला आवाहन करण्यात आले.यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस संजू परब यांच्या श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मत व्यक्त करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे आभार मानले.या पुलासाठी ग्रामस्थांनी व जमीन मालकांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे आभार मानले.तर संजू परब यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करत असल्याने परब यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासीत केले.

यावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर,ग्रा सदस्य अमोल नाईक,अर्जुन मुळीक,सानिका शेवडे,कविता शेगडे,मधुकर जाधव,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तंटा मुक्ती अध्यक्ष प्रकाश पार्सेकर,केतन आजगावकर,परीक्षित मांजरेकर,ग्रामस्थ,जमीन मालक,शेतकरी आदी उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!