▪️शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर; केंद्रातील मोदी सरकारनं नियोजनबद्ध आणलं सुलतानी संकट

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१२ मार्च
साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी दोडामार्ग चौकात काजू शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. बिचाऱ्या काजू बागायतदार बांधवांना रास्ता रोको करण्याची परिस्थिती उलटली, हे महायुती सरकारचे मोठे अपयश आहे. तसचं आता सुलतानी संकट काजू शेतकऱ्यांवर आहे, आजच्या घडीला राज्याचं महायुती सरकार आणि केंद्र शासनाचे भाजप सरकार या शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हेच स्पष्ट होते, अशी टीका उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. परुळेकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आजही आमच्या रुग्णांना गोव्याला जाव लागत आहे. गोव्यात ‘भायलो’ हे आम्हाला का ऐकावं लागतं ? असा सवालही त्यांनी केला.

डॉ. परुळेकर म्हणाले, आपला कोकणातील काजू चविष्ट आहे. मात्र, यावर केंद्रातील मोदी सरकारनं नियोजनबद्ध संकट आणलं आहे. लाखो टन काजू आयात केल्यान स्थानिक काजू शेतकऱ्यांवर संकटं कोसळलं. १६० रू ओल्या काजूला एकेकाळी दर होता. पण, आज घाट्याचा धंदा करावा लागत आहे. आयात दर कमी केल्यानं चविष्ट नसणारा काजू इथे यायला लागला आहे. अर्थसंकल्पात काजूला स्थान नसताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केवळ फसवणूक करत आहे. १५ लाख टन काजू बी परदेशातून येत आहे. तर साडेसात लाख टन काजू बी उत्पादन देशाच आहे. त्यामुळे स्थानिक काजू बीला रक्कम मिळत नाही. परदेशातील हा काजू ८०-८५ रूपयांन पडतो. स्थानिक काजू १२५ रूपयाला देखील परवडत नाही. अन् शालेय शिक्षणमंत्री म्हणातात १३५ रू. प्रती किलोन विकत घेणार ? केवळ फसवणूक केली जात आहे. ते खोटं सांगत आहेत.बेरोजगारी, महागाई चरण सीमेवर असताना तुम्ही केलं काय ? त्यात आता काजू बागायतदार देशोधडीला लागले आहेत. हे केंद्र सरकारमुळे ओढावलेल सुलतानी संकट आहे.

दरम्यान, चष्मा कारखाना, सावंतवाडी टर्मिनस, सेटॉफ बॉक्स, मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल आहे कुठे ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला. आजही रुग्णांना गोव्याला जाव लागत आहे. ‘भायलो’ हे आम्हाला का ऐकावं लागतं आहे. कारण, चांगलं रूग्णालय आमच्या भागात बनू शकल नाही. जिल्ह्याची नव्हे तर राज्याची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावान फक्त भुलथापा मारल्या जातात अशी टीका डॉ. परूळेकर यांनी केली.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!