II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.०६ मार्च
रोझारिओ मित्र मंडळ उभादांडा आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला,यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रविवार दि.०३ मार्च २०२४ रोजी पूर्ण प्राथमिक शाळा नं २ उभादांडा सुखठणवाडी येथे ७ वे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताची असलेली कमतरता लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,डॉ अभिजित वनकुद्रे,सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जी एम सी गोवा ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर,न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक सावळाराम कांबळी सर,किशोर नरसुले गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी संजय पिळणकर यांनी उभादांडा गावचे सुपुत्र कै सनी रेडकर यांचे संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यात रक्तदान चळवळीत मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले,तसेच रोझारिओ मित्रमंडळ सातत्याने रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत असून या मंडळाचे कार्य हे इतर मंडळांना आदर्शवत असल्याचे सांगितले.तसेच या गावचे सुपुत्र ॲलिस्टर ब्रिटो हे ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे असून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच रुग्णांना रक्तदान करून कै सनी रेडकर यांचा वारसा पुढे चालू ठेवल्याचे सांगून त्यांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी रोझारिओ मित्रमंडळाचे अध्यक्ष डिक्सन ब्रिटो,सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला कार्यकारिणी उपाध्यक्षा सौ समृद्धी संजय पिळणकर – मूननकर,सचिव श्रीकृष्ण कोंडुसकर, खजिनदार भूषण मांजरेकर, सहखजिनदार सचिन कोंडये,पिंटू गावडे,रोझारिओ मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!