▪️प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांना ह्युमन राईट च्या वतीने निवेदन…
II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!🖥️ सावंतवाडी | दि.२३ फेब्रुवारी
सन २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने टिटेंड ग्लास बाबत निर्णय दिलेला.व्हेईकल
ॲक्टच्या नियमानुसार सर्व खाजगी वाहनाच्या काचा ट्रान्स्फरंर्ट (पारदर्शक) असाव्या गाड्यांच्या काचा सर्रास बऱ्याच प्रमाणात काळ्या फिल्म लावून डार्क केल्या जातात.याबाबत नियमांची अंमलबजावणी होताना आढळत नाही.यामुळे अनैतिक धंदे, गुन्हेगारांना फिरणे, दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात इत्यादी व्यवहार बेकायदेशीर होताना दिसत आहेत नियमांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे यासाठी संबंधित वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करा असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.नंदकिशोर काळे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल यांना देण्यात आले .
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव ॲड मोहन पाटणेकर,कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत, उपाध्यक्ष सुर्यकांत धुरी,सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर,जिल्हा सदस्य नामदेव जानकर,बाळा कोरगांवकर आदी उपस्थित होते.
____________________________________
👉बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________