II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.१८ फेब्रुवारी
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा उचललेल्या वेंगुर्ले कोट उर्फ किल्ले डच वखारची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत होती.या पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेली दहा ते बारा वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिमा राबविल्या जात होत्या.
वेळोवेळी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात गाठीभेटी घेऊन वेंगुर्ले कोटीच्या दुरुस्तीसाठी निवेदन पण देण्यात आलेली होती.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेंगुर्ले कोट बाबतीत वेळोवेळी लिखाण करुन या किल्ल्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी पद्मश्री परशूराम गंगावणे यांनीहि पाचारण केलं होतं आणि या सगळ्या प्रयत्नाना यश येऊन वेंगुर्ले कोट या किल्ल्याची डागडुजी काम सुरू करण्यात आल्याने जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पुरातत्व विभागाचे आभारी आहोत असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ लिंगवत यांनी वेंगुर्ले कोटीच्या दुरुस्ती कामाच्या पाहणी प्रसंगी केले.यावेळी कंत्राटदार कर्मचारी कुमार जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचा शुभारंभ पुरातत्व विभागाचे संचालक विलास वहाने व जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सई लिंगवत यांच्या हस्ते दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात आला.यावेळी कंत्राटदार कुमार जाधव व पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
इ.स.१६३७ मध्ये आदिलशहा यांच्या कडून परवाना व योजना घेऊन इ.स.१६४१ पुर्वी या किल्ल्याच बांधकाम करण्यात आले होते.

वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार इ.स. १६६७ मध्ये दक्षिण कोकण मोहिम शिवरायांच्या ताब्यात आली होती.
इ.स.२१ मार्च १६७५ मध्ये शिवरायाचे वेंगुर्ले येथे आगमन झाल्याची इतिहास नोंद सापडते.हा किल्ला इ.स.१६७७ डच यांच्या ताब्यात परत आला.
इ.स. १६८३ मध्ये औरंगजेब यांच्या पुत्राने डच वखार लुटली होती.
इ.स.१६९६ डच व फ्रेंच यांच्यात वेंगुर्ले येथे चकमक झाली व इ.स.१७०० मध्ये खेम सावंत यांचा वेंगुर्ले कोटचा ताबा घेतला.नंतर इ.स.१८१२ सावंतवाडीच्या राणी यांनी इंग्रजांना वेंगुर्ले कोटचा ताबा दिला तर स्वातंत्र्यानंतर म्हणजे इ.स.१९४७ नंतर सरकारी कार्यालये व पोलीस चौकीसाठी महाराष्ट्र शासनाने वापरलेली हि वास्तु इ.स.१९६३ पर्यंत शासकीय कार्यालयासाठी वापरण्यात आली व नंतर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली.नंतरच्या काळात लोकांनी लाकुड सामान विकुन फरशा चोरल्या व लोखंडी तोफा पळविल्या.
अजुनही पहिला मजला व काही खोल्या सुस्थितीत असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोल्या असलेली हि एकमेव वास्तु आहे.
येथे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवून वेळोवेळी किल्ले डच वखार संवर्धन व संरक्षण बाबतीत पुरातत्व विभागाला फक्त सुचनाच केल्या नाहीत तर रत्नागिरी येथे जाऊन या बाबतीत जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्र व्यवहार केला आहे.

वेंगुर्ले कोट उर्फ डच वखारचे स्वराज्यासाठी योगदान.
सोळाव्या शतकात शिवरायांतर्फे रंगो पंडित व नेतो पंडित यांनी वेळोवेळी वेंगुर्ले कोटातील डच अधिकारी यांच्याशी वाटाघाटी केल्या असल्याचा शिवचरित्रा मध्ये उल्लेख आहे .
इ.स.१६७६ ते इ.स.१६७८ हि दोन वर्षे शिवराय,अष्टप्रधान मंडळ व महसूल प्रमुख अण्णोजी दत्तो यांनी वेंगुर्ले तील डच अधिकारी रोम्बाउट लेफर व अब्राहम लेफरब यांच्या सोबत व्यापारी हक्क कायम राखण्यासाठी वाटाघाटी केल्या त्या बदल्यात जपान वरुन आयात केलेले कैक टन तांबे स्वराज्य कार्यासाठी मराठ्यांना देऊन डचांनी शिवरायांच्या सहकार्याने व्यापारी हक्क कायम राखले व वेळोवेळी डच व्यापारी यांनी शिवरायांना नजराणा भेट दिल्याने शिवरायांनी डच यांना कौल देऊन डच यांना व्यापारासाठी संरक्षण दिले.
वेंगुर्ले कोट येथील डच अधिकारी छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण संपर्कात राहून विश्वास संपादन करून आपला व्यवसाय करत होते.
इ.स.१६६३ मधील शिवरायांनी केलेल्या कुडाळ कोट स्वारी साठी डचानी सहकार्य केले होते.त्या बदल्यात १ में १६६४ रोजी शिवरायांनी कुडाळ कोट ताब्यात घेतला तेव्हा डचांना त्यानी संरक्षण दिले.
इ.स.१६७७ मध्ये शिवरायांनी जिंजीच्या किल्ला घेतल्यानंतर डच अधिकारी यांनी त्यांचं अभिनंदन केल्याचा उल्लेख दस्तऐवज मध्ये सापडला असून डच अधिकारी सॅम्युएल ऑस्टीन हे शिवरायांच्या संपर्कात होते.
इ.स.१६७४ मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाला हेन्री ऑक्झिडेन व डच सर्जन जाॅन फ्रायर हे उपस्थित होते.
इ. स. १६६७ मध्ये बारदेशवर स्वारी करण्यासाठी झालेल्या चर्चेत वेंगुर्ले येथील डचानी शिवरायांना सहकार्य केल्याचे पोर्तुगीज दस्तऐवज मध्ये नोंद सापडते.
इ.स. १६७७ मध्ये कर्नाटकात तेगनापरम व पोरोनोव्हा येथे वखारी उभे करण्याचे परवाने शिवरायांनी डचाना दिले होते.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!