▪️राजन पोकळे ;१७ ते १९ या कालावधीत होणार मोहोत्सव…

▪️प्रवेश मोफत; जास्तीत- जास्त शिवप्रेमींनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.. डॉ. सोनल लेले

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१५ फेब्रुवारी
दीपक केसरकर मित्र मंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार यांच्या माध्यमातून सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते राजन पोकळे आणि शिवसंस्कारच्या प्रमुख डॉ. सोनल लेले यांनी दिली. या महोत्सवाला रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू आणि नरसिंह शिवराय ही तीन ऐतिहासिक नाटके सादर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कलाकार मिलिंद कासार, भरत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पोकळे म्हणाले, शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या नाट्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.१७ ते १९ या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात होणार असल्याचे सांगितले. तर १७ तारीख ला रात्री ८ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या तीन दिवशीय मोहोत्सवात “रायगडाला जेव्हा जाग येते” हा नाट्य प्रयोग होणार आहे. त्यानंतर १८ तारखेला रात्री ८ वाजता “इथे ओशाळला मृत्यू” हे नाट्य सादर करण्या येणार आहे. तर १९ तारखेला “शिवपूजन व सांगता सोहळा” होणार आहे. त्यानंतर “नरसिंह शिवराय” हे नाट्य सादर करण्यात येणार आहे. या महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त शिवप्रेमींनी या महोत्सवालाआनंद घ्यावा असे आवाहन शिवसंस्कारच्या प्रमुख डॉ. सोनल लेले यांनी केले आहे.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!