II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१४ जानेवारी
सावंतवाडीतील सुरू असलेल्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान संमेलनात चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक समितितील शिक्षिकानी एकापेक्षा एक मंगळागौरीचे खेळ सादर करुन सांस्कृतिक कार्यक्रमाला चार चाँद लावले.


मंगळागौरीचे व्रत चैतन्य आणणारे व एकजुटीचा आनंद देणारे असे म्हटले जाते. या खेळाची कोकणच्या मातीशी असणारी नाळ आजही घट्ट टिकून आहे. याच खेळाची ओळख प्रभावी सादरीकरणातून राज्यभरातील शिक्षक, बालवैज्ञानिक व विद्यार्थ्याना करुन दिली. दोडामार्ग गटविकास अधिकारी नदाफ व डायट च्या अधिव्याख्याता सौ. पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतीक कार्यक्रमाचे देखणे नियोजन करणाऱ्या सांस्कृतीक समितीने मंगळवारी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौर सादर करून उपस्थित सर्वानाच चकित करुन टाकले. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या बी कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये प्रियदर्शनी कावले, सोनाली बांदेलकर,प्रा. सुषमा मांजरेकर, वर्षा राणे, प्रीती सावंत आदींनी सहभाग घेतला. ढोलकी साथ शिक्षक जाधव यांनी दिली . राज्य विज्ञान संस्था नागपूरच्या संचालक राधा अतकरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर, अधिव्याख्याते प्रवीण राठोड,शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, डायट च्या अधिव्याख्याता सौ.पेडणेकर,सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडल अध्यक्ष पांडुरंग काकतकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी व सांस्कृतिक समिती प्रमुख नदाफ यांनी या शिक्षकांचे कौतुक केले.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!