II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ कणकवली | दि.१४ फेब्रुवारी
मालवण तालुक्यातील कुंभारमाठचे प्रतिथयश आंबा बागाययदार डॉ. उत्तम फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीत नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्याबद्दल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी डॉ. फोंडेकर यांना कणकवली प्रहार भवन येथे ‘विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत ‘ या कार्यक्रमात सत्कार करण्यासंदर्भात पत्र पाठवून कुटुंबासहित उपस्थित राहण्यास सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. फोंडेकर यांचा मंत्री राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशाचे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भाषणात उत्तम फोंडेकर यांचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारची डॉक्टरेट अतिमहनीय कार्य केलेल्या व्यक्तींनाच मिळते. श्री. फोंडेकर यांनी आपल्या देदीप्यमान कार्याने मालवण कुंभारमाठला हापूस आंब्याच्या बाबतीत देवगडच्या बरोबरीत आणून ठेवले. त्यांनी यशाचा वेगळाच मापदंड समाजासमोर ठेवला आहे. फोंडेकर सिंधुदुर्गाचा आयडॉल असल्याने तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यावा, असेही मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच सत्कारावेळी फोंडेकर यांना तुमच्या कार्यात काहीही अडचणी आल्यास मला हाक द्या, मी चांगल्या कार्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे सांगितले. तसेच त्यांनी आंब्यासंदर्भात महत्वाची माहिती जाणून घेतली व काही महत्वाच्या सूचनाही मंत्री राणे यांनी फोंडेकर यांना केल्या.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!