▪️१४ फेब्रुवारीला मुख्‍यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते होणार सन्‍मान !..

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१२ फेब्रुवारी
‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासा’चे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे. १४ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’, शिवाजी पार्क, दादर येथे महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

या सोहळ्‍याला प्रमुख अतिथी म्‍हणून राज्‍याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे कार्याध्‍यक्ष श्री. रणजित सावरकर, शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्‍यक्ष आमदार श्री. आशिष शेलार, भाजपचे प्रवक्‍ते तथा आमदार श्री. अतुल भातखळकर, शिवसेनेचे मुख्‍य प्रतोद आमदार श्री. भरतशेठ गोगावले, सुदर्शन न्‍यूजचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे मुंबई अध्‍यक्ष श्री. प्रवीण दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ता श्री. रमेश शिंदे आणि अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित असतील, अशी माहिती ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या संयुक्‍त प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्‍यात आली आहे.

५०० वर्षांनंतर अयोध्‍येत उभ्‍या राहिलेल्‍या भव्‍य श्रीराम मंदिराच्‍या निर्माणामध्‍ये प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मोलाचे योगदान दिले आहे. इतकेच नव्‍हे, तर वयाच्‍या १७ व्‍या वर्षांपासून श्रीमद़्‍भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, दासबोध, योगवसिष्‍ठ यांद्वारे लोकशिक्षणाचे मोठे कार्य स्‍वामीजींनी केले आहे. कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्‍वामी श्री जयेंद्र सरस्‍वती यांनी स्‍वामीजींना ‘परमहंस संन्‍यासा’ची दीक्षा दिली. स्‍वामीजींनी आळंदी (पुणे) येथे आश्रम स्‍थापन करून भावी पिढ्यांसाठी ‘संत श्री ज्ञानेश्‍वर गुरुकुल’, ‘श्रीकृष्‍ण सेवानिधी न्‍यास’, ‘महर्षि वेदव्‍यास प्रतिष्‍ठान’ आदीद्वारे राष्‍ट्र आणि धर्म यांचे मोठे कार्य चालवले आहे. त्‍यांच्‍या अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍याच्‍या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्‍यवर येणार आहेत. या सोहळ्‍याला हिंदू बांधवांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहावे, असे आवाहन ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. या सोहळ्‍याविषयी अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करावा.


____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!