II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी | दि.०७ फेब्रुवारी
बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी कलामहाविद्यालयाचा
रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करण्याचा मानस आहे.
कलाशिक्षणाचा प्रसार आणि उपयोग जिल्ह्यात सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने महाविद्यालयातर्फ़े दरवर्षी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे आयोजन आपापल्या प्रशालेमध्ये करावयाचे ठरवले आहे.
ही स्पर्धा व तिचे गटानुसार विषय खालीलप्रमाणे –
*गट* विषय
अ) नर्सरी ज्यु ते इयत्ता ४ थी १. फुल किंवा फळ
ब) इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी १. रंगपंचमी किंवा गणपती मिरवणूक
क) इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी १. चहाची टपरी किंवा वनभोजन
ड) खुला गट १. निसर्गचित्र किंवा वस्तुचित्रण (Stilllife)
आपल्या प्रशालेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची स्पर्धा आपल्या प्रशालेत आयोजीत करुन दि. २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चित्रे महाविद्यालयात खालील पत्त्यावर जमा करावीत.
सदर चित्रांचे महाविद्यालयात परीक्षण करुन प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकास अंतिम
फेरीसाठी महाविद्यालयात आमंत्रित केले जाईल. सदर अंतिम फेरी मार्च २०२४ मध्ये
महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शनाच्या दरम्यान घेण्यात येईल.
प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक विजेत्यास रु. १०००/-रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह,
द्वितीय पारितोषिक विजेत्यास रु.७००/- रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह,
तृतीय पारितोषिक विजेत्यास रु ५००/- रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येईल.
त्याच प्रमाणे प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धेचे नियम व अटी:
प्रवेश शुल्क प्रत्येकी रु.३०/-
सदर स्पर्धेसाठी सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वत:चे वापरायचे आहे.
कागदाचा आकार – ए-३ (११x१५ इंच )
चित्राच्या मागे विद्यार्थ्यांनी आपले संपुर्ण नाव, शाळेचे नांव, इयत्ता, गट व मोबाईल नं. लिहिणे आवश्यक आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वार्षिक कलाप्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात आमंत्रित करुन गौरविण्यात येईल. तसेच विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात लावण्यात येतील.
पत्ता : सर्व्हे नं. ५४/०१ वन विभागाजवळ, सालईवाडा-सावंतवाडी
*संपर्क क्र. ०२३६३ २७५३६१/९४०५८३०२८८/९४२०२६०९०३.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6