▪️मा. नगराध्यक्ष बबन साळगावकर ; आंबोली पर्यटनासाठी प्रखर आंदोलन करणार…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | शैलेश मयेकर | दि.०५ फेब्रुवारी
आंबोली मध्ये असंख्य अपघात झाले असून गेल्या वर्षी केलेला रस्ता पूर्ण खराब झाला आहे.तसेच गेल्या दहा वर्षात आंबोली घाटात ४० कोटी पेक्षा जास्त खर्च झाला असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. यासंदर्भात आपल्या शिष्टमंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची आज कार्यालयात भेट घेतली.

दरम्यान दहा वर्षात आंबोली घाटमार्गात झालेल्या खर्चाची माहिती मिळावी तसेच या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, इंजिनीयर यांच्या प्रॉपर्टीची ईडी मार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभियंता किणी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

तसेच आंबोली मुख्य रस्ता, महादेव गड पॉईंट रस्ता, हिरण्यकेशी कावळेसात पॉईंट रस्त्यांची झालेली दूरदर्शन याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा श्री साळगावकर यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी आंबोली, गेळे, चौकुळ या भागातील माजी सैनिकांनी आंबोलीच्या विकासास व पर्यटनासाठी हे भ्रष्टाचारी उंदीर मुळासकट कुडतरत आहेत त्यांच्या विरोधी आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री साळगावकर यांनी केले आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री किनी यांनी या कामांबाबत आपण माहिती घेऊन अधिकारी अथवा इंजिनियर दोशी आढळल्यास योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोकटे, उमेश कोरगावकर, मिहीर मटकर आदी उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!