II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ बांदा | राकेश परब | दि.०४ फेब्रुवारी
शेतकरी व फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग यांनी काजु ला हमी भाव मिळावा अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत फळबागदार संघ सावंतवाडी दोडामार्ग चे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले.

काजू हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५-७० टक्के शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मात्र २००१ पासून आता २०२३ पर्यंतच्या कालावधीत काजू दरात मोठी वाढ झालेली दिसत नाही दोन-तीन वर्षाचा कालावधी वगळता. २००१ मध्ये काजू बी चा दर चाळीस रुपये प्रति किलो होता तो २०२३ मध्ये १२० च्या आसपास राहिलेला आहे. या २३ वर्षाच्या कालावधीत मजुरी मात्र वीस वरून पाचशे रुपये पर्यंत गेली. व खतामध्येही २१ पटीने वाढ झालेली आहे. आणि काजूचा दर फक्त तिप्पटीने वाढला आहे. मोठ्या शेतकऱ्यांना सोडा परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही हा दर परवडत नाही किंबहुना त्यांची मजुरी ही त्यामधून सुटत नाही. अशा अवस्थेत मागच्या पंधरा-वीस वर्षात ज्या तरुणांनी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःला काजू उत्पादनात गुंतविले त्यांचा फार मोठा भ्रमनिरास झाला आहे. २०१८ पासून शेतकरी व फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांचे संघटन करणे, अवकाळी पाऊस नैसर्गिक कोप अशावेळी त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे, माकड ताप, अकस्मात मृत्यू, वन्य प्राण्यांपासून नुकसान अशा अनेक बाबतीत शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न, काजू आंबा नारळ इत्यादी पिकांचा विमा उतरून थोडीफार नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न, शासकीय अधिकारी व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा विनिमय करून आपल्या प्रमुख फळ पिकांना योग्य दर मिळवून देण्याचा प्रयत्न, अशी अनेकविध मार्गाने म्हणजे धरणे आंदोलन, लाक्षणिक आंदोलन, आमदार विविध खात्याचे मंत्री यांना निवेदन देणे इत्यादी प्रयत्न केलेले आहेत.असे अनेक प्रयत्न करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्याने सिंधुदुर्ग कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या संघटनांना एकत्र करून पुढील मार्ग क्रमण करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे दिनांक २० जानेवारी रोजी कोल्हापूर मधील आजरा येथे चंदगड गडहिंग्लज व आजऱ्यातील चार-पाचशे शेतकरी एकत्र येऊन यशस्वी काजू परिषद घेण्यात आली. ताबडतोब दिनांक २३ जानेवारी कणकवलीत वागदे येथे गोपरी आश्रमात कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संघटना एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांना व शासकीय अधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या सध्याच्या हलाखिच्या परिस्थितीची जाणीव करून देऊन त्यावर उपाययोजनाही सांगितली. आणि काजू दर प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव द्यावा अशी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु नुसते शेतकरी मेळावे व प्रसार माध्यमातून मागण्या करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे येत्या पंधरा-वीस दिवसात आपल्याला तालुका तालुक्यात धरणे आंदोलन, लाक्षणिक आंदोलन व आमरण उपोषण असे संसदीय मार्गाचे प्रकार करणे आवश्यक आहे. आजरा येथे झालेली काजू परिषद व कणकवली गोपुरी येथे घेतली पत्रकार परिषद यामुळे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वातावरण निर्माण होऊन अनेक लोकप्रतिनिधी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हा संघटनांशी संपर्क साधत आहेत. सर्व शेतकरी तर आक्रमक झाले सनदशीर मार्गाने आंदोलने केली तर निश्चितच सरकारला आपल्याला हमीभाव द्यावाच लागेल जसे की गोवा शासनाने आपल्या शेतकऱ्यांना काजू बी ला १५० रुपये हमीभाव दिला आहे. मोदी सरकारने नेमलेल्या रंगनाथन स्वामी आयोगाने उत्पादनाच्या दीडपटीने हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे दापोली आपल्याला हमीभाव द्या अपेक्षा.सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन काजुला हमीभाव मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे ठरविले

____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!