▪️…वेळेत काम सुरु न झाल्यास ८ फेब्रुवारी ला पुन्हा उपोषणाला बसणार; ग्रामस्थ्यांचा ईशारा

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२७ जानेवारी
असनीये व घारपी ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी रस्त्या संदर्भात पुकारलेले उपोषण संबंधित विभागाच्या आश्वासना नंतर मागे घेण्यात आले आहे.

असनिये जुना स्टॅन्ड ते घारपी येथील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे उघडून गेल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे जोखमीचे बनले आहे. तसेच या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी बस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने या ठिकाणाहून शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच दोन्ही गावातील आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. याबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे असनीये व घारपी गावातील ग्रामस्थांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी आमरण उपोषण पुकारले होते. या उपोषणाला दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका असनीये व घारपी वासियाने घेतले होते. सकाळी दहा वाजता चालू झालेले उपोषण रात्री ८ वाजता संबंधित विभागाकडून ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संबंधित रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे ग्रामस्थ प्रितेश ठिकार यांनी सांगितले.

यावेळी दि.३ फेब्रुवारी २०२४ च्या पूर्वी कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा दोन्ही उपोषणाला बसणार असल्याचे पत्र ग्रामस्थांनी ग्रामसडक योजना कुडाळ यांच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपोषणासाठी सहकार्य केल्याबद्दल उबाटा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी आमदार राजन तेली, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखअशोक दळवी, विनायक दळवी, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, प्रमोद गावडे तसेच ग्रामस्थांचे असनीये सरपंच सौ रेश्मा सावंत यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी उपोषणाला उपसरपंच साक्षी सतीश सावंत, प्रितेश प्रदीप ठिकार, भिकाजी सुभाष नाईक, प्रेमानंद नारायण ठिकार, लक्ष्मण राघोबा सावंत, परेश बाळकृष्ण सावंत, शैलेश शिवराम खाडोलकर, बाळकृष्ण सोमा सावंत, विलास साबा सावंत, लक्ष्मण वासुदेव सावंत, विनोद विश्वनाथ सावंत, उत्तम कृणा सावंत, अनुप दत्तप्रसाद दामले, जितेंद्र रमेश सावंत, उमेश नारायण ठिकार, सतीश सुधाकर सावंत, हनुमंत पांडुरंग सावंत, सुमंत यशवंत असनियेकर, प्रदीप यशवंत ठिकार, निलेश विश्वास पोकळे आदी उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!