▪️ कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन संजय गुप्ता याच्याकडे दिले लेखी निवेदन…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ तळेरे | दि.२८ डिसेंबर
कणकवली रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या संदर्भात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन संजय गुप्ता यांची आज कणकवली येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्याबाबतच्या मागण्यांचे लेखी निवेदन याप्रसंगी संघटनेच्या वतीने चेअरमन संजय गुप्ता यांना देण्यात आले.

सुरुवातीला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन संजय गुप्ता यांचे संघटनेच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कणकवली रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्या संदर्भात लक्ष वेधून लेखी निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने कणकवली रेल्वे स्टेशन संदर्भात रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर २ च्या पलिकडे सर्विस रोड मंजूर करण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्टेशन हे सतत वर्दळ असलेले अतिशय महत्त्वाचे आणि मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची सततची ये-जा चालू असते. यामध्ये अपंग व्यक्ती, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्लॅटफॉर्म नंबर २ वरून प्लॅटफॉर्म नंबर १ वर येण्यासाठी जिना चढून सामान वाहून नेणे फारचं जिकरीचे होते. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर २ च्या पलीकडे लवकरात लवकर सर्विस रोड मंजूर करण्यात यावा.

कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ ला संपूर्ण प्रवासी शेड मंजूर करण्यात यावी. संपूर्ण प्रवासी शेड नसल्यामुळे ऊन, वारा, पाऊस,थंडी यापासून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक रेल्वे प्रवासी संख्या ही कणकवली रेल्वे स्टेशनला असते. येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांची मोठी संख्या लक्षात घेता कणकवली येथे नेत्रावती एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा देण्यात यावा. अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन संजय गुप्ता यांना देण्यात आले.तसेच याबाबत सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली.

यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, रत्नागिरी जिल्हा सचिव- विकास पेजे, कणकवली तालुका कार्याध्यक्ष- हनीफभाई पीरखान, तालुकाध्यक्षा- सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, संघटक तथा स्पेक्टो मार्टचे संचालक मंगेश चव्हाण, सदस्य भरत तळवडेकर, कोकण रेल्वे कार्पोरेशनचे रत्नागिरी क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक आर.आर.कांबळे व इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!