खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होणार भव्य सत्कार समारंभ…

        II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

     🖥️  वेंगुर्ला | दि.१२ डिसेंबर     
सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाकरे गट शिवसेना उत्कर्ष पॅनलने सर्व अकराही जागेवर विजय मिळवला आहे.  या सर्व विजयी संचालक मंडळाने आज तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची सावंतवाडी संपर्क कार्यालयात भेट घेतली यावेळी श्री राऊळ यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी अध्यक्ष गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती.

     यावेळी चंद्रकांत कासार, गजानन सावंत, रमेश गावकर, अशोक परब, दशरथ मोरजकर, अंकुश माळकर, संजू गावडे, उल्हास परब, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, सदानंद चव्हाण, संजय गवस, गुणाजी गावडे, संदिप माळकर, पुरुषोत्तम राऊळ, नारायण सावंत, संजय गावडे आदी उपस्थित होते.

   दरम्यान निवडून आलेल्या सर्व संचालकांचा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री राऊळ यांनी सांगितले आहे.

यावेळी राऊळ म्हणाले, येत्या काळात खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुंधती दुधवडकर, कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संचालकांचा सत्कार समारंभ सावंतवाडीत होणार आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप  ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K    ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!