II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सातार्डा I दि.०२ नोव्हेंबर
मांद्रे येथील कला परिवार व फोंडा येथील गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालय आयोजित निवासी कीर्तन व संस्कार प्रशिक्षण शिबिर दि: ०३ ते ०५ नोव्हेंबरला होणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर मांद्रे येथील आर.डी.खलप हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये ११ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना आरत्या, स्तोत्रे, भगवद् गीता, संगीत, जोगवा, गोंधळ, दींडी, अभिनय , योगा, समतोल आहार आदी विषयांवर राष्ट्रीय कीर्तनकार व प्राचार्य श्री सुहास बुवा वझे, नाट्य शिक्षक परेश नाईक, योग गुरू सनी अंबार सरिया, डॉ. वंदना सावंत,संगीत शिक्षक दशरथ नाईक , उदेश पेडणेकर व सौ. कीर्ती पार्सेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गृह निर्माण मंडळाचे अध्यक्ष व आमदार जित आरोलकर यांच्या हस्ते शिबिराचे विधिवत उदघाटन होणार आहे.

यावेळी व्यासपीठावर मांद्रे ग्रामपंचायत सरपंच ॲड. अमित सावंत, फोंडा कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य श्री सुहास बुवा वझे, आर. डी. खलप हायस्कूल मुख्याध्यापक शरद गावडे,कला परिवार संस्था अध्यक्ष मनोहर म्हामल, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, दामोदर कामत व सोमनाथ पार्सेकर उपस्थित राहणार आहेत.

शिबिर कालावधीमध्ये गावातील महालसा मंदिर, मधलामाज व श्री सातेरी देवस्थान, मराठवाडा पर्यंत प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत. दिनांक ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. ” कीर्तनातून समाज प्रबोधन ” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शिबिराचा समारोप दिनांक ५ नोव्हेंबर रोजी होणार असून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते सहभागी मुलांना प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

गोव्यातील कीर्तन प्रेमी तसेच कलाकारांनी शिबिर कालावधीमध्ये उपस्थिती दर्शवून मुलांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन पालक सुधाकर साटेलकर यांनी केले आहे.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!