II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी I दि.३१ ऑक्टोबर
मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज कोलगाव मराठा समाज बांधवांची बैठक कोलगाव सरपंच संतोष राऊळ,माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर,चंदन धुरी, प्रशांत कोठावळे,सौ अपर्णा कोठावळे,अभिजीत टीळवे, शिवदत्त घोगळे,एल एम सावंत व सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,या बैठकीत गुरुवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गावातून बाईक रॅली निघणार आहे व ठिक दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.

सदरची बैठक मेघश्याम काजरेकर यांच्या निवासस्थानी पार पडली,यावेळी,उपोषण व रॅली चे नियोजन करण्यात आले, प्रत्येक मराठा समाज बांधवांनी आपली मते मांडली,उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या,गावातील रॅलीला व उपोषणाला बहुसंख्य मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले

यावेळी कैलास परब,प्रकाश म्हापसेकर, गुरुनाथ करमळकर, विश्वनाथ कोचरेकर, चंद्रकांत सावंत,मनोज घाटकर, मनोहर ठिकार,महादेव राऊळ, काशिनाथ करमळकर,प्रभाकर राऊळ,संदिप गवस,अनिल ठिकार,राजन ठाकुर,सुदेश राणे,राजेश राऊत, आकाश ठाकूर,आनंद राऊळ,प्रविण परब,नितेश ठाकूर,विश्राम सावंत,राकेश ठाकूर,प्रकाश धुरी, श्रीकृष्ण सावंत, तुकाराम म्हापसेकर, संतोष टिळवे,लक्ष्मण सावंत,वैभव परब, सचिन आधारी,लक्ष्मण धुरी,सागर धुरी,महेश धुरी,तानाजी म्हापसेकर, विशाल म्हापसेकर,अशोक म्हापसेकर,संदेश राऊळ,महादेव सावंत,विनायक परब, नरेंद्र राणे,रुपेश परब,सिध्देश सावंत,दिलीप टीळवे, सच्चिदानंद ठाकूर, बाळकृष्ण काजरेकर,बळीराम काजरेकर,आदि उपस्थित होते.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!