▪️कु‌.दुर्वा पाटील,रोहन गावडे,युग पंदारे,कु.सानवी कुराडे व कु.सानिका मत्तलवार, राजाराम सावंत अव्वल!…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ तळेरे I दि.१६ ऑक्टोबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘डिजिटल हॉल’ मध्ये आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी कु.दुर्वा पाटील,रोहन गावडे,कु.सानवी कुराडे,युग पंदारे, राजाराम सावंत आणि कु.सानिका मत्तलवार यांनी विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या प्रकारात जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

*या जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-*
*१४वर्षा खालील मुली* *( ट्रॅडिशनल प्रकार)*
१)कु.दुर्वा प्रकाश पाटील(कासार्डे हायस्कुल) प्रथम क्रमांक,
२)कु.दूर्वा मिलिंद अखेरकर. (पेंडूर हायस्कूल) द्वितीय क्रमांक,
३)कु.अनुष्का अभिजीत आपटे. तृतीय क्रमांक( पोदार हायस्कूल),
४) कु.श्रेया रामचंद्र डोईफोडे. (एस एम हायस्कूल कणकवली) चौथा क्रमांक,
५) कु.काव्या मुक्तानंद गवंडळकर (पोदार हायस्कूल) पाचवा क्रमांक,
*१४वर्षा खालील मुलगे.* *( ट्रॅडिशनल प्रकार)*
१) रोहन विलास गावडे(पेंडूर हायस्कूल) प्रथम क्रमांक,
२) कल्पेश उदय निकम (कासार्डे हायस्कूल) द्वितीय क्रमांक,
३) समर्थ रुपेश वारके. (आंबोली हायस्कूल) तृतीय क्रमांक,
४) कुणाल मुक्तानंद गवंडळकर ( पोदार हायस्कूल) चौथा क्रमांक,
५) भावेश धोंडी घाडीगावकर. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल)- पाचवा क्रमांक,
*१७वर्षा खालील मुली* *( ट्रॅडिशनल प्रकार)*
१) कु.सानवी केशव कुराडे. (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली) प्रथम क्रमांक,
२)कु. हर्षिता अजित सावंत. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल) द्वितीय क्रमांक,
३) कु.आर्या गोविंद फाटक. (आयडियल मिडीयम स्कूल) तृतीय क्रमांक,
४) कु.कृतिका राजेंद्र पंदारे.(पेंडूर हायस्कुल) चौथा क्रमांक,
५)कु.आदिती अर्जुन पेढूरकर. (पेंढूर हायस्कूल) पाचवा क्रमांक.
*१७वर्षा खालील मुलगे*
*(ट्रॅडिशनल प्रकार)*
१) युग गणपत पंदारे (पेंडूर हायस्कूल) प्रथम क्रमांक,
२) मयूर सुभाष हाडशी. (कासार्डे हायस्कूल) द्वितीय क्रमांक,
३) सचिन संपदा तेली. (आंबोली हायस्कूल) तृतीय क्रमांक,
४) आर्यन सुरेश वारके. (आंबोली हायस्कूल) चौथा क्रमांक,
५) रुद्र राजेंद्र ढगे. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल) पाचवा क्रमांक,
*१९ वर्षाखालील मुली*
*(ट्रॅडिशनल प्रकार)*
१) कु.सानिका प्रवीण मतलवार (कासार्डे जुनिअर कॉलेज कासार्डे)प्रथम क्रमांक,
२) कु.गौरवी राघोबा मिठबावकर.( वराडकर विद्यालय)द्वितीय क्रमांक,
३)कु.श्रावणी राजेंद्र मराठे. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल) तृतीय क्रमांक,
४)कु.ईशा म्रिणाल कीर्तनीया. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल) चौथा क्रमांक,
५) कु.समृद्धी प्रशांत सावंत. (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल) पाचवा क्रमांक,
*१९ वर्षाखालील मुलगे* *(ट्रॅडिशनल प्रकार)*
१)राजाराम चंद्रहास सावंत (महाविद्यालय कट्टा) प्रथम क्रमांक,
*१९ वर्षाखालील मुली*
*(रिदमिक योगा)*

 

१)सानिका प्रविण मत्तलवार. (कासार्डे ज्युनियर काॅलेज कासार्डे) प्रथम क्रमांक
यशस्वी खेळाडूंना दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कासार्डे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय भोसले यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानून विजेत्या खेळाडूंना कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेला योगा जज्ज म्हणून राज्यस्तरीय पंच संजय भोसले, श्वेता गावडे,तेजल कुडतरकर, प्रियांका सुतार ,नवनाथ काणकेकर आदीनी उत्तम कामगिरी बजावली आहे.
या यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा योगासन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

सलग दोन दिवस सुरू असलेल्या यास्पर्धेला जिल्ह्यातील विविध शाळांमधून बहुसंख्य खेळाडुंनी सहभाग घेतला होता.
कासार्डे शिक्षण संस्था, प्राचार्य व विद्यालयाच्या संपूर्ण टीमने सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!