II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ बांदा I दि.३० सप्टेंबर
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक महेश नार्वेकर हे आपल्या मडूरा येथील मूळ गावी येऊन गणपतीची यथा विधी पूजा केली तसेच गणेश चतुर्थी निमित्त त्यांनी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. यावेळी आजू बाजूच्या गावातील नागरिकांनी व लोक प्रतिनिधीनी त्यांच्या निवासस्थानी जात बाप्पचे दर्शन घेत श्री नार्वेकर यांची भेट घेतली व मडुरा माऊली मंदिर नजीकच्या पुलाच्या कामासाठी नार्वेकर महोदयांनी आमच्या ग्रुपला खूप मदत केली त्याबद्दल यांचे धन्यवाद व्यक्त केले.भविष्यात पंचक्रोशीतील काही कामे आणू त्यास मदत करण्याची विनंती केली.
यावेळी श्री नार्वेकर यांनी मी मडुरा गावचा रहिवासी आहे आणि आजूबाजूची पंचक्रोशी आपलीच आहे. आपण कधीही हाक द्या मी माझ्या परीने होईल ते सर्व सहकार्य आपणास करेन असे आश्वासन दिले.
यावेळी समितीचे अध्यक्ष पंडित सर,सतोसे माजी सरपंच आबा धुरी,बबन सतोस्कर,सामाजिक कार्यकर्ते मांजरेकर,मडुरा माजी सरपंच आनंद परब,सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण भोगले,दिलीप परब,रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे,सामाजिक कार्यकर्ते गाड बुवा,पत्रकार प्रवीण परब,तात्या माधव आणि सन्माननीय नार्वेकर साहेबांचा संपूर्ण परिवार उपस्थित राहून कार्यक्रम करण्यात आला.
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K