II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२९ सप्टेंबर
ओटवणे गावच्या महात्मा फुले गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सगुण गावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ओटवणे ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या ग्रामसभेत त्यांची निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या सुरुवाती पासून आता पर्यंतच्या १७ वर्षाच्या कालावधीत मधली दोन वर्षे सोडली तर १५ वर्षे या समितीवर असणाऱ्या आणि सध्या ओटवणे गावचे सरपंच पद भूषवित असणारे मावळते तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या .तर गावच्या सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या आणि कित्तेक वर्षापासून तंटामुक्ती समितीवर असणाऱ्या सगुण गावकर यांनी ही आपल्या निवडी बाबत ग्रामस्थांचे आभार मानले. व भविष्यात अध्यक्ष म्हणून काम करत असताना सरपंच तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांच्या सहकार्याने गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच संतोष कासकर, पोलिस पाटील लक्ष्मण ऊर्फ शेखर गावकर, ग्रा.सदस्य प्रशांत बुराण, सदस्या संजना जाधव, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, माजी ग्रा. सदस्य संतोष तावडे, ग्रामसेवक अमित रावूळ, रविन्द्र गावकर, उमेश म्हापसेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी अध्यक्ष सगुण गावकर यांना शुभेच्छा दिल्या.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!