▪️सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न…

II KBC NEWS II
kokanbhumi
🖥️ सावंतवाडी | शैलेश मयेकर :दि.३१ मे
तालुका संजय गांधी अनुदान योजना समितीची सभा गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी सावंतवाडी तहसील कार्यालय येथे तहसिलदार अरुण उंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील एकूण ४४ अर्जापैकी ४२ प्रकारणे मंजूर करण्यात आली तर २ अर्ज नामजूर करण्यात आले
२)इंदिरा गांधी विधवा नि. वे. योजना १ अर्ज प्राप्त तो मंजूर करण्यात आला.
३)श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना २२ पैकी २१ मंजूर १ नामंजूर.
४)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील केवळ १ अर्ज आला तो मंजूर करण्यात आला. एकूण ६८ प्रकरणांपैकी ६५ प्रकरणे मंजूर व ०३ प्रकरणे नामंजूर करणेत आली.
या सभेला वासुदेव नाईक, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी, सागर साळुंखे, मुख्याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी, मनोज मुसळे, नायब तहसिलदार, डी. व्ही. मेस्त्री, अव्वल कारकून आदि उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.शासन निर्णय क्र. विसयो- २०१८/प्र.क्र.६२/विसयों दिनांक २० ऑगस्ट, २०१९ अन्वये ही सभा संपन्न झाली. या संदर्भात प्रसिद्धीपत्रकदेण्यात आले आहे.


___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!