*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ वेंगुर्ला | संजय पिळणकर :दि.३०_*
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५ वा वार्षिक ‘व्यापारी एकता मेळावा’ मंगळवार दि.३१ जानेवारी २०२३ रोजी वेंगुर्ला-भटवाडी येथील ‘सिद्धिविनायक सभागृहात’ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.यावेळी या मेळाव्याचे उदघाटन उद्योजक रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात मान्यवरांची मनोगते, प्रमुख वक्त्यांचे विचार,महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार वितरण,कै. माई ओरोसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार वितरण, अध्यक्षांचे मनोगत होणार आहे. तर दुपारी २.३० नंतर प्रमुख वक्त्यांचे विचार,जिल्ह्यातील नवउद्योजकांशी गप्पा,कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार प्रदान,सर्वोत्तम तालुकाध्यक्ष पुरस्कार प्रदान,आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान व समारोप अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने व्यापारी बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी आपले व्यवसाय बंद ठेऊन मेळाव्यास उपस्थित राहावे व व्यापारी मेळावा यशस्वी करावा असे आवाहन वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक – शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!