▪️कळसगिरीत रंगीत फुलांचे पर्यटन व्हावे यासाठी सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे प्रयत्न !

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ रोहा | शशिकांत मोरे |दि.३० जानेवारी
रोहा रंगीत फुलांचे शहर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या सिटी ऑफ फ्लाॅवर्स ग्रुपने कळसगिरी डोंगराच्या हिरव्या गर्द कुशीत रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यार्थी जंगलातील झाडे झुडपे, हिरव्यागार वातावरणात अक्षरशः रममान झाले. वेगवेगळी निसर्ग चित्रे काढून त्यामध्ये रंग भरले. सुट्टीचा दिवस असतानाही ८५ विद्यार्थ्यांनी डोंगरातील या स्पर्धेचा आनंद लुटला, कळसगिरीच्या डोंगरात रंगीत फुलांचे पर्यटन व्हावे यासाठी सिटी ऑफ फ्लाॅवर्स ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

रोहा शहराला लागून असलेल्या कळसगिरीची डोंगरकपारी रंगीत फुलांचे पर्यटन स्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्यासह विविध सेवाभावी संस्था, रोहा नगरपालिका, रोहा वन विभाग आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी दर रविवारी झाडांचे संगोपन करणे, जंगल सुरक्षेसाठी उपाययोजना, पाण्याच्या स्त्रोतचे जतन करण्यासाठी अविरतपणे झटत आहेत ही मंडळी स्वतःसाठी आनंददायी जगता जगता निरोगी आरोग्याचा मंत्र अनेकांसाठी देत आलेत, त्यातून प्राचीन तलावाची उभारणी, रंगीत फुलांची लागवड करून पर्यटन स्थळासाठी झटणाऱ्या सिटी ऑफ फ्लाॅवर्सने रोटरी क्लब व विविध संस्थांच्या माध्यमातून रविवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे भव्य खुले आयोजन केले.

यावेळी रोहा इंडस्ट्रीज असो.चे अध्यक्ष पी पी बारदेशकर, रोहा सिटीझन फोरमचे निमंत्रक प्रदीप आप्पा देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर, सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे हेड सुरेंद्र निंबाळकर, संदीप सावंत, उदय ओक, बापू जोशी, हेमंत मोहिते व मान्यवर आदी उपस्थित होते.

लहान व मोठे अशा दोन गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मोठया गटात प्रथम श्रवण देवे, द्वितीय भुमिका रुपेश तळेकर, तृतीय अदिती महेश पाटील, उत्तेजनार्थ क्रमांक गार्गी राजेंद्र जाधव प्राप्त केले, छोटया गटात प्रथम आलिया अमजद शेख, द्वितीय ओंकार महेश पाटील, तृतीय क्रमांक सृष्टी लक्ष्मण डोलकर हिने पटकावले. स्पर्धेचे परीक्षण किरण मुक्षे, रुपेश कर्णेकर आणि किरण बेंडखळे यांनी केले, विजेत्यांना बक्षिसे व रोख रक्कम तर सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन कौतुक करण्यात आले. स्पर्धेसाठी सिटी ऑफ फ्लॉवर्सचे राजेंद्र जाधव यांनी सूत्रे हाताळत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले, इंडस्ट्रीज असो.चे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनी मार्गदर्शन केले, प्रोजेक्ट हेड सुरेंद्र निंबाळकर यांनी प्रास्ताविक तर परीक्षक किरण मुक्षे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. स्पर्धेसाठी उदय ओक, संदीप सावंत, हेमंत मोहिते, समीर दळवी, सचिन दळवी, बापू जोशी, स्मिता जोशी, सुनिता नारकर, स्वप्नाली निंबाळकर, समिधा अष्टीवकर, दिपाली जाधव, प्रथमेश शिर्के, प्रिती बेंडखळे, दिप्रेश सावंत, आदित्य ओक आदींसह सर्व सहभागी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

कळसगिरीच्या डोंगरांत सिटी ऑफ फ्लॉवर्स एक चळवळ व्हावी, या चळवळीत अधिक लोक जोडले जावेत, येथे रंगीत फुलांचे पर्यटन व्हावे यासाठी आमचे सामूहिक प्रयत्न आहेत. ही चित्रकला स्पर्धा त्याचेच एक भाग होती, विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यातिल या स्पर्धेचे आनंद घेतला.
– सुरेंद्र निंबाळकर – प्रोजेक्ट हेड

आजच्या शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाची पर्यायाने दऱ्याखोऱ्या डोंगराच्या कुशीची आवड लागावी, निसर्गाची ओढ लागून डोंगराची, झाडांची जपणूक व्हावी, जंगल पूर्वीसारखे घनदाट, रम्य व्हावेत, हे चित्रकला स्पर्धेमागील प्रांजळ हेतू होते.
– राजेंद्र जाधव – स्पर्धा संयोजक
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!